You are currently viewing जिल्हा बँकेचे पुढच्या वर्षीचे पुरस्कार सतीश सावंतांनीच द्यावेत – वैभव नाईक

जिल्हा बँकेचे पुढच्या वर्षीचे पुरस्कार सतीश सावंतांनीच द्यावेत – वैभव नाईक

जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार…

ओरोस
जिल्हा बँक मार्फत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा मानाचे पुरस्कार देवून गेली सहा वर्षे सन्मान केला जात आहे. या सन्मानाने सत्कारमूर्तीच्या कामाची प्रचिती राज्य व देशभर पसरत आहे. जिल्हा बँकेचे काम देशात चांगले आहे. प्रत्येक वर्षी बँकेला तीन-चार पुरस्कार मिळत असतात, असे जिल्हा बँकेबद्दल गौरोउद्गार काढताना आ वैभव नाईक यानी पुढील वर्षी होणारा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्याच अध्यक्षतेखाली व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिंधूदुर्ग जिल्हा बँकची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सिंधूदुर्गनगरी येथील शरद कृषि भवनमध्ये सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यानंतर बँकेने जाहिर केलेल्या २०१९-२० च्या विविध पुरस्कारांचे वितरण आ वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, माजी अध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, संचालक विकास गावडे, अतुल काळसेकर, व्हीक्टर डांटस, प्रमोद धुरी, गुरुनाथ पेडणेकर, नीता राणे, प्रज्ञा परब, अविनाश माणगांवकर, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, आ टी मर्गज, विद्याधर बांदेकर, नितिन शेट्ये, गुलाबराव चव्हाण, राजन गावडे, शरद सावंत, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, जिल्हा दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम के गावडे, प्रसाद रेगे, पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.
यावेळी स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सावंतवाडी येथील डॉ राजेशकुमार प्रकाशचंद गुप्ता यांना कार्यक्रम अध्यक्ष आ वैभव नाईक यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. कै शिवरामभाऊ जाधव स्मृती प्रत्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार कुडाळ तालुका सहकारी विक्री संघ लि. कुडाळ यांना, कै केशव रावजी राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गचे संस्थापक पिटर फ्रान्सिस डांटस यानां, कै डी बी ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी कर्मचारी पुरस्कार जयदीप सुरेश पाटील एम डी डॉ डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादित गगनबावडा यांना, तर कै भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुरस्कार देवगड दहिबाव येथील श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, वृक्ष रोप व सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा