*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अडगळ*
जग बदललं माणसं बदललीत
मी ही आता नाहीसा झालो
अडगळ झालं माझं घर
काहींच्या तर मी पायदळी आलो
खूप आधार होता म्हणे माझा
सोबत मी नेहमीच असायचो
घर छोटं काय मोठं आय
कुठेही लख्ख उजळून दिसायचो
घराच्या एक कोपऱ्यात
स्थान माझं असायचं
त्या प्रखर उजेडामध्येही
घर कसं नवं दिसायचं
अंधाराशी झुंज देत
आशेचा प्रकाश पेरत रहायचो
स्वप्नांच्या कुशीत झोपलेले चेहरे
नव्याने जगतांना बघायचो
आता नव्या युगाच्या माणसांनी
माझी अडगळीत व्यवस्था केली
चंदेरी सोनेरी प्रकाशात
व्यथा माझी अस्ताव्यस्त झाली
कुणास सांगावी कहाणी माझी
समजून कोणी घेइना
तेलाची उब वातीची जिद्द
कुणालाच काही आठवेना
हरकत नाही….
अडगळीत जरी पडून राहीलो
तरी आठवणीत मी जिवंत आहे
कारण अंधाराला घाबरवणारी
ती जुनी ज्योत अजून पेटलेली आहे.
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
