You are currently viewing शिक्षण क्षेत्रात मसुरे एज्युकेशनचे कार्य अभिमानास्पद!- डॉ.दीपक परब

शिक्षण क्षेत्रात मसुरे एज्युकेशनचे कार्य अभिमानास्पद!- डॉ.दीपक परब

मालवण

शिक्षण क्षेत्रात मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई चे कार्य आज संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानास्पद आहे. गेली अनेक वर्ष ही संस्था प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील यशस्वी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची रोख रकमेच्या स्वरूपात थाप मारत आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अनेक गुणवान होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्यात येत आहे.आजच्या या गुणवान सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये कष्ट, जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर आपल्या गावाचे, प्रशालेचे, पालकांचे नाव उज्वल करावे असे आवाहन मसूरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर दीपक परब यांनी मसुरे येथे बोलताना केले.

मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी व पाचवी ते नववी, इयता अकरावी मधील गुणवान विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे ६० हजार रुपयांची रोख स्वरुपातील बक्षिसे गुणवान विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. मसुरे गावामध्ये विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सत्कार कार्यक्रम यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी लोकल कमिटीचे अध्यक्ष महेश बागवे म्हणाले, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे कार्य अतुलनीय असे आहे. येथील सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी या सर्वांच्या प्रयत्नामुळे येथील दोन्ही प्रशाला प्रगतीपथावर आहेत. यासाठी संस्थेच्या वतीने या सर्व शिक्षकांचे पालकांचे ग्रामस्थांचे आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर डी किल्लेदार यांनी केले. यावेळी लोकल कमिटीचे अध्यक्ष महेश बागवे, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष श्री उत्तम राणे, मधुकर प्रभुगावकर, देऊळवाडा सरपंच सौ आदिती मेस्त्री व बिळवस सरपंच सौ. पालव, श्री. राजन परब, विठ्ठल लाकम, मुख्याध्यापक आर डी किल्लेदार, प्रकाश विठ्ठल परब सुरेश बागवे,गणपत परब, आर बी कांबळे,संजना मसुरेकर,शहाजी चोगुले, एस आर कांबळे, पंडित नाचणकर डी पी पेडणेकर, बाळू परब, के अे चव्हाण,पूनम चव्हाण, भानुदास परब, रमेश पाताडे, अनिल मेस्त्री, एन एस जाधव, प्रसाद यंदे नार्वेकर मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, अर्चना कोदे, श्रीमती नाटेकर मॅडम, किरण घाटे,सतीश वाघमारे,एस डी बांदेकर आदी उपस्थित होते.

यावेळी इयत्ता दहावी व बारावी मधील जिल्हास्तरावर ती एक ते तीन क्रमांक विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली आणि त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित गुणवान विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेकडे विविध दात्यांनी ठेवलेल्या कायमस्वरूपी ठेव योजनेतील बक्षीस रकमेचे ही वितरण गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी पी पेडणेकर व आभार बी एस ठाकूर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा