You are currently viewing वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांचा मुंबई येथे कोकणरत्न पदवी देवून सन्मान..

वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांचा मुंबई येथे कोकणरत्न पदवी देवून सन्मान..

वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांचा मुंबई येथे कोकणरत्न पदवी देवून सन्मान..

वेंगुर्ले l प्रतिनिधी.

वेंगुर्ल्याचे सुपुत्र लेखक, व्यंगचित्रकार तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री संजय गोविंद घोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री सचिन कळझुणकर यांचे हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे कोकणरत्न पदवी प्रदान करून सत्कार करण्यात आला.

श्री घोगळे यांनी मुंबई तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवास्पद कामगिरी केली असून यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांचे दोन वेळा प्रशासकीय कामामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आलेले आहे. व्यंगचित्रकार म्हणून त्यांची दखल अमेरिकन वेबसाइट वर सुद्धा घेण्यात आली असून लेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. या पुरस्कार सोहळ्याला स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक श्री संजय कोकरे, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, दिलीप लाड, सुभाष राणे हे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री घोगळे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा