You are currently viewing भंडारी फेडरेशन भविष्यात विधायक कार्यासाठी कटीबद्ध! -श्री. सत्यवान यशवंत रेडकर

भंडारी फेडरेशन भविष्यात विधायक कार्यासाठी कटीबद्ध! -श्री. सत्यवान यशवंत रेडकर

*भंडारी फेडरेशन भविष्यात विधायक कार्यासाठी कटीबद्ध!*
-श्री. सत्यवान यशवंत रेडकर

रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी विक्रोळी, कन्नमवार नगर येथील विकास महाविद्यालयात समविचारी भंडारी बांधवांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून समन्वय साधत व एकत्र येत “भंडारी फेडरेशन” (नियोजित) च्या कार्यकारिणी निवडणूक तसेच प्रथम ठरावात सहभाग नोंदवला.

“भंडारी फेडरेशन” ही एक समन्वय संस्था असेल जी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भंडारी समाजाशी संबंधित समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल, धोरण ठरवेल, सामाजिक अधिकारांसाठी आवाज उठवेल. नवीन वर्षात भंडारी समाजाच्या हक्क, आरक्षण, सामाजिक कल्याण या बाबतीत राज्य/राष्ट्रीय पातळीवर विधायक कार्य करणारी संस्था “भंडारी फेडरेशन” म्हणून स्थापन केली जाईल असे प्रतिपादन या संकल्पनेचे प्रणेते, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले. ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी समन्वयक स्वरूपात श्री. गणेश राऊळ, श्री. दिनकर नांदोस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री. विनय राऊत सर यांनी सदर प्रक्रियेसाठी विकास महाविद्यालयात जागा व इतर सुविधांची उपलब्धता केली.

सदर फेडरेशनच्या ठरावा मध्ये फेडरेशन ची घटना, नियमावली याबाबतीत प्रकटीकरण करण्यात आले त्याचप्रमाणे ऑनलाइन/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान प्रक्रियेत (२०२६-२०२८) साठी निवडून आलेल्या नवनियुक्त कार्यकारिणीत ऍडव्होकेट संजय गंगाराम तेंडुलकर (अध्यक्ष), श्री. सुरेश गोपीनाथ भंडारी (उपाध्यक्ष), श्री. गणेश जगदिश राऊळ (सचिव), श्री. कृष्णा धोंडू कांबळी (उपसचिव), श्री. दिनकर विश्वनाथ नांदोसकर (खजिनदार) या भंडारी बांधवांची मुख्य पदाधिकारी स्वरूपात निवड करण्यात आली. व्यक्तिशः व ऑनलाइन माध्यमातून भंडारी बांधवांनी निवडणूक प्रक्रियेत मतदान केले. “समाज परिवर्तनाचे एक नवीन पर्व, नवीन अध्याय” या घोषवाक्यानुसार “भंडारी फेडरेशन” च्या माध्यमातून भविष्यात भंडारी समाजाला सर्वतोपरी विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असण्याची तयारी उपस्थितांनी दर्शवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा