*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
मनी अहिरानी माय…
पानी पडे धबधब
मावठीम्हा वाहे पानी
अशी अस्सल सुंदर
माय मनी अहिरानी..
वतू जास जशी ती
दुधवरनी ती साय
गुईनी ती गोडी तिले
अशी अहिरानी माय…
वट्टावर बठतीस
चावयतीस त्या बाया
मनम्हानं बोलतीस
खुसुरखुसुर कागाया…
हिरीदना बोल माय
अहिरानीना गोडवा
अहिरानीनाज झेंडा
अटकेपार आते लावा…
रिमझिम बरसस
झिरपस ती मनम्हा
गोड कितला सेतस
अहिरानीना त्या गाना…
इस्नूकिस्नू कांड्या भरे
राही रखुमाई पोयतं
लगीनले येस देखा
देवगन त्यानं गोतं….
असा महिमा से तिना
अहिरसंनी ती भाषा
सदा राहू द्या मुखम्हा
सुगरनना तो “कोसा”…
पोसा पोसा अहिरानी
करा तिना लाडकोड
करा जतन तिले हो
तयहातवरना फोड…
जलमता शिकनूत
बोल अहिरानीना बोल
भाषा भलतीज गोड
हिरकनी अनमोल…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
