You are currently viewing देशाचे, राज्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी लेदरबॉलला महत्व द्या – युवराज लखमसावंत भोसले

देशाचे, राज्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी लेदरबॉलला महत्व द्या – युवराज लखमसावंत भोसले

सावंतवाडी

टेनिसपेक्षा लेदरबॉल क्रीकेट खेळण्यासाठी येथिल नवोदित खेळाडूंनी लक्ष द्या.तरच ते भविष्यात देशाचे आणि राज्याचे प्रतिनिधीत्व करू शकतात,असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज येथे केले.
सावंतवाडी संस्थानाने बापुसाहेब महाराजांच्या काळापासून नेहमीच क्रीडा क्षेत्राला पाठबळ दिले आहे.त्याचा वारसा यापुढे ही नक्कीच सुरू ठेवला जाईल,त्यासाठी कधीही हक्काने हाक मारा,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सावंतवाडी येथे एम क्रीकेट अ‍ॅकेडमी आणि मुंबई येथिल शिवाय क्रीकेट अ‍ॅकेडमी अंधेरी यांच्यात सामने खेळविण्यात आले होते.याचे बक्षिस वितरण आज करण्यात आले.यावेळी सरासरी गुणांनुसार मुंबईतील शिवाय अ‍ॅकेडमीला विजेतेपद देण्यात आले.यावेळी ते बोलत होतेे.
या प्रसंगी एम क्रीकेट अ‍ॅकेडमीचे प्रमुख राहूल रेगे, जावेद खतिब,बाळा मडगावकर तसेच शिवाय अ‍ॅकेडमीचे अरुण खानोलकर,पत्रकार अमोल टेंबकर,निखिल माळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ठ फलंदाज म्हणून यश घाडी,तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून नागेश रेगे यांना गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा