You are currently viewing नाम शक्ती

नाम शक्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

    *”नाम शक्ती”*

 

गोंदवल्यातील स्पंदने देती परमानंद

हलका होई भार मनावरील ताण!!धृ!!

 

परिसरात प्रवेशिता जातो भारावून

घेता समाधी दर्शन वाटे समाधान

शुद्ध मने भाविता होती कामना पूर्ण!!1!!

 

महाराजांची असे प्रेमळ नजर सर्वत्र

जाणवे नामाचा गजर कणाकणांत

झाड लावले संतांनी निर्मोही मनानं!!2!!

 

महाराजांचे कुळी असे कुलकर्णी वतन

रामावर अढळनिष्ठा बालपणापासून

ठेवती एक ध्यास तारील केवळ नाम!!3!!

 

जाता एक वार विसरे घरदार भान

त्यास मिळे नाम सार घ्यावे मुक्त मनानं

वैभव उभे राहिले सारे नामाची ताकद!!4!!

 

तेथल्या प्रसादाची गोडी राहे अवीट

गुरु सत्तेनं चाले नित्यक्रम अन्नदान

शतकोत्तर वर्षे चालू राहे अव्याहत!!5!!

 

मोक्ष प्राप्तीचे रहस्य सांगती श्री ब्रह्मानंद

महाराजांचे शिष्य झोकून देती जीवन

गुरूंची सांगी घ्यावे नाम सर्व मी पाहिन!!6!!

 

गुरू ऐसा मिळणे समजावे भाग्यवान

गुरूं वाहती भक्तांची काळजी आवर्जून

गोंदवले क्षेत्रांतील सेवा असे ज्ञानपीठ!!7!!

 

श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा