You are currently viewing ओरोस येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली भेट   

ओरोस येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली भेट   

ओरोस येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली भेट

ओरोस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BART) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED) सिंधुदुर्ग द्वारा, आयोजित बारटी द्वारे सीपित स्वयं सहायता युवा गटातील अनुसूचित जातीच्या SC प्रवर्गातील युवक- युवती करिता एक महिना कालावधीचा (अनिवासी)निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण समाजकल्याण ओरोस येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव यांनी भेट दिली. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी रवी जाधव यांनी उपस्थित प्रशिक्षण लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित वर्गातील युवा पिढीला आवाहन केले आहे.

प्रशिक्षण प्रमुख राजेश कांदळगावकर प्रकल्प अधिकारी, सुषमा साखरे (कांबळे ) कार्यक्रम समन्वयक MCED, विजय कदम जिल्हा प्रकल्प अधिकारी बार्टी सिंधुदुर्ग तसेच पी एस कांबळे MSME ऑफिसर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून देण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की एम.सी.इ. डी. सिंधुदुर्ग तर्फे विविध उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले जाते उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक- युवतींना उद्योग निवड, प्रकल्प नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी, परवाने व कायदेशीर प्रक्रियेत अद्यावत तंत्रज्ञान अशा विषयांवरील सर्वकष मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाते आजवर या प्रशिक्षणाच्या प्रोत्साहनातून अनेकांनी स्वतःचे व्यवसाय उभारण्यात यश मिळवले आहे. तरी या प्रशिक्षणाचा लाभ अनुसूचित वर्गातील 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींनी घेऊन आपला उद्योग धंदा सुरू करावा यासाठी ही प्रशिक्षण संस्था आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवि जाधव यांनी सांगितले याप्रसंगी सुषमा साखरे पी एस कांबळे तुषार चव्हाण व रवि जाधव उपस्थित होते.

युवा पिढीसाठी उद्योजकता संदर्भातील प्रशिक्षण व उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम सावंतवाडी शहरांमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर लावण्यात येईल असे रवी जाधव म्हणाले.
तरी सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी रजिस्टन्सचे फक्त दोनच दिवस राहिले आहेत तरी अधिक माहितीसाठी सुषमा साखरे कार्यक्रम समन्वयक MCED 7774876139 व पी एस कांबळे 8669128874 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा