मोफत नेत्रतपासणी शिबिराचे १३ डिसेंबर रोजी सावंतवाडीत आयोजन
सावंतवाडी
नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड सिंधुदुर्ग NAB–सावंतवाडी यांच्या वतीने ४० वर्षावरील स्त्री-पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या नेत्रदोषांची तपासणी करण्यासाठी विशेष नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत, भटवाडी, सावंतवाडी येथे भरविण्यात येणार आहे.
शिबीर पूर्णपणे मोफत असून सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याशिवाय आवश्यक त्या औषधोपचार, उपचार पद्धती तसेच शस्त्रक्रिया अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नेत्रतपासणीसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या उपयुक्त उपक्रमाचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
