मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व शहरातील लॉ कॉलेजेसच्या वतीने स्वारगेट चौकात मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क पटनाट्याचे आयोजन.
10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्त लाँ कॉलेजचे विद्यार्थी व संस्थेच्या माध्यमातून पटनाट्यद्वारे,पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली, मानवधिकार म्हणजे जन्मताच मिळालेले मुलभूत हक्क, मानवी हक्कामुळे भेदभाव, गुलामगिरी, छळापासून संरक्षण मिळणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,कायद्यासमोर जात,धर्म,वंश,लिंग असा भेदभाव न करणे हे मानवधिकार शिकवते, मानवी हक्काचे प्रकार नागरी हक्क,राजकीय हक्क ,आर्थिक हक्क ,सामाजिक हक्क ,सांस्कृतिक हक्क हे जपण्याचा हक्क प्रत्येक मानवाला दिला आहे, यामध्ये मिळतात समानतेचा हा राज्यघटनेने दिलेला एक मूलभूत हक्क आहे,पटनाट्यामध्ये नागरिकांचे अधिकार ,कर्तव्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा न्याय मागण्याचा अधिकार हे पटनाटक्यातून सादरीकरण करण्यात आले. या पटनाट्यामध्ये सूर्यदत्ता लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज,शिवाजी मराठा लॉ कॉलेज,जाधवर लॉ कॉलेज इत्यादी कॉलेजेसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी”जन जन को जगाते चलो, आपणा अधिकार दिखाते चलो. मुक्त शिक्षा का उपहार, हर इंसान का अधिकार.
मानवाधिकार समानता ,स्वतंत्रता का अधिकार असे लिहिलेले कपडे घालून स्पीकर द्वारे जनजागृती करत होते.
संस्थाध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की दरवर्षी आम्ही मानवाधिकार दिनानिमित्त वेगवेगळ्या चौकामध्ये पटनाट्याद्धारे सादरीकरण करत असतो आणि नागरिकांचे असलेल्या हक्क ,कर्तव्य, आणि मा. न्यायालयात दाद मागणीचे अधिकार आधिकार याविषयी जनजागृती करण्यात येते.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती रेवती देशपांडे म्हणाल्या की, या संस्थेची काम अत्यंत चांगले असून वर्षभर ही संस्था अन्याय,अत्याचार आणि पिढीसाठी काम करत असते आणि मोफत विधी सल्लाही देत असते.त्यानी मागणी केल्यास आम्ही पण गोरगरिबांना संस्थेप्रमाणे मोफत वकील ही देत आसतो गरजूवंत नागरिकांनी याचा फायदा घेतला पाहिजे असे मत न्यायमूर्ती रेवती देशपांडे यांनी पटनाट्याच्या वेळी व्यक्त केले .
यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश रेवती देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,संचालक .अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा मीना करंजावणे, सचिव गजानन धाराशिवकर,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी,खेड अध्यक्ष शंकर नाणेकर, आकाश भोसले ,अण्णा मंजुळे,बाळू कुचेकर ,राम पाटील,,प्रकाश बोदडे,पिलानी घाटे ,सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
