नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई – केवायसी करुन घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात सन 2025-26 वर्षामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिके, शेतजमीन, बियाणे व तद्अनुषंगिक बाबी ईसाठी झालेल्या नुकसानाकरीता शासनाकडून नुकसान भरपाईचा निधी पुढीलप्रमाणे प्राप्त झाला आहे.
| शासन निर्णय दिनांक | नुकसानीचा महिना | मंजूर निधी (रक्कम रुपये) |
| 12.09.2025 | जून 2025 नुकसान | 12,63,000/- |
| 4.11.2025 | जून ते सप्टेंबर 2025नुकसान (बियाणे व इतर) | 15,94,000/- |
| 17.10.2025 | ऑगस्ट 2025 नुकसान | 4,79,000/- |
| 22.07.2025 | फेब्रुवारी ते मे 2025 नुकसान | 54,41,000/- |
| 18.10.2025 | सप्टेंबर 2025 नुकसान | 8,29,000/- |
| 17.10.2025 | जून 2025 नुकसान (शेतजमीन) | 88,000/- |
| 13.10.2025 | जुलै 2025 नुकसान | 97,000/- |
| 08.12.2025 | ऑक्टोंबर 2025 नुकसान | 4,08,69,000/- |
| एकूण | 5,06,60,000/- |
या नुकसान भरपाईची रक्कम ही ई- केवायसीव्दारे लाभार्थ्यांना वाटप होत असून यासाठी शेतकरी, लाभार्थींनी आपल्या तहसिल, तलाठी कार्यालयातून VK क्रमांक (विशिष्ट क्रमांक) प्राप्त करुन घेऊन जवळच्या महा –ई सेवा केंद्रावर जाऊन स्वत:ची ई- केवायसी करुन घ्यावी. यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.
तरी नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्याच्या अनुषंगाने नुकसान ग्रस्त शेतकरी, लाभार्थींनी तलाठी, तहसिल कार्यालय, नजीकच्या महा ई- सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
