You are currently viewing नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सिंधुदुर्गनगरी

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षणाचे 87 वे सत्र 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 पर्यंत कालावधी सुरु होत आहे.  मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग मालवण येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र.ग. मालवणकर यांनी केले आहे.

 प्रशिक्षण कालावधी– दिनांक 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026, आवश्यक पात्रता- उमेदवारांचे वय 18 ते 35 असावे, (आधार कार्ड व रेशन कार्डची छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक (शाळा सोडल्याचा दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छिमार असावा.( विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) उमेदवारास पोहता येणे आवश्यक.

 प्रशिक्षण शुल्क – सहा महिन्याचे रु. 2700/- मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. 600 /- मात्र, (दारिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक)

रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी – राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय घेऊन नौका बांधता येते. सागरी नौकेवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.

          इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालयास संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून विहित नमुन्यातील अर्ज 31 डिसेंबर पर्यत कार्यालयाच्या वेळेत कामकाजाच्या दिवशी  कार्यालयास सादर करावे.

अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र.ग. मालवणकर,  मोबा. 9422216220 वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा