You are currently viewing जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

*जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक*

*कुडाळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*

*नवनियुक्त तालुकाप्रमुख कृष्णा धुरी व तालुका संघटक सचिन कदम यांचा करण्यात आला सत्कार*

विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या सत्ताधारी आमदार, खासदार यांनी गेल्या वर्षभरात कुडाळ तालुक्याचा कोणताही विकास केला नाही. याउलट महायुती सरकारकडून शाळा, हायस्कुल बंद पाडल्या जात आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळयोजनेचे एकही काम सत्ताधारी आमदार, खासदार पूर्ण करू शकले नाहीत.कुडाळमध्ये रस्ते खड्डेमय झाले आहेत. कुडाळ मधील आरोग्य सुविधा ढासळली आहे. आम्ही सुरु केलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजमधून नागरिकांना चांगल्या सुविधा देखील सत्ताधारी देऊ शकत नाहीत.नागरिकांना गोवा बांबुळी येथे उपचारासाठी जावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे प्रश्न निर्माण झाले असून सत्ताधाऱ्यांवर नागरिकांचा रोष वाढत आहे. शिवसेना पक्षच जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा आवाज उठवावा. त्याचबरोबर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी करा असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि पदाधिकारी यांची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुकाप्रमुख पदी कृष्णा धुरी व कुडाळ तालुका संघटकपदी सचिन कदम यांची निवड झाल्याने शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकासंपर्क प्रमुख अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगांवकर,अवधूत मालणकर, विभागप्रमुख दिपक आंगणे, मंगेश बांदेकर, बाळा कांदळकर, गंगाराम सडवेलकर, दत्ताराम उभारे , शैलेश विरनोडकर, राजेंद्र घाडीगावकर, नरेंद्र राणे, दशरथ मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा