पुणे / प्रतिनिधी :
मराठी साहित्यातील लेखक व कवींना प्रेरणा व बळ देणारी साहित्य सम्राट ही संस्था साहित्यिकाना मार्गदर्शक ठरली आहे मराठी साहित्यातील ही संस्था पुण्याची मानबिंदू ठरली आहे असे मत डॉ संजयजी चोरडिया यांनी व्यक्त केले.
पुणे येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बावधनच्या सभागृहात तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणेच्या दशकपूर्ती व वर्धापनदिन सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते उद्घाटक पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री उदय देशपांडे, समाजसेविका तृप्ती देसाई, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी साहित्यसम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांच्या साहित्यसम्राट संस्थेला मान्यवरांच्या हस्ते अग्रेसर संस्था हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले डॉ चोरडिया म्हणाले की उपस्थित प्रत्येक जण कलागुणांनी संपन्न आहे. समाजासाठी ज्याला कार्य करायचे आहे त्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. समाज प्रबोधनामुळेच समाजामध्ये सकारात्मकता वातावरण निर्माण होईल.
तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रिया दामले म्हणाल्या की, साहित्य सम्राट या संस्थेने मराठी भाषा संवर्धनासह साहित्यक्षेञात नवदितांना उदयास आणण्याचे बहुमूल्य कार्य केले. गेली अनेकवर्षे विविध उपक्रमांद्वारे कवी संमेलनाचे विनामूल्य आयोजन सर्वांसाठी करत आहे. बहुभाषिक साहित्यिकांना घेऊनही संस्थेने दोनशेपेक्षा जास्त कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी घेतले आहेत.
साहित्य सम्राटचे विनोद अष्टुळ हे सर्वांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्त्व आहे. आता केवळ बागेमध्ये अथवा अन्य ठिकाणी कवी संमेलन घेताना पुणे मेट्रोमध्येसुद्धा कवी संमेलन घ्यावे असे आपले मत व्यक्त केले. ज्येष्ठ नाट्य कलावंत बाळ पुजारी, क्षमा वैद्य, सिद्धार्थ झाडबुके, विठ्ठलराव जाधव, मधुसूदन घाणेकर, चित्रा साठे, मंदाताई नाईक, यशवंत देव, विलास बाबर, रामचंद्र पाचुणकर, गौरव पुंडे, एम.अजया आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रिया दामले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुवर्णा जाधव यांनी व्यक्त केले.

