*अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, दैनिक ठाणे वैभव, सुस्वर क्रिएशन्स व माऊली एक शैक्षणिक ध्यास संस्थांचा संयुक्त उपक्रम*
ठाणे: अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, दैनिक ठाणे वैभव, सुस्वर क्रिएशन्स व माऊली एक शैक्षणिक ध्यास आदी संस्थांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्याने आयोजित करण्यात आले होते. यावेळी *वाचू आनंदे लेख स्पर्धा २०२५* आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तीनशे हून अधिक लेख परिक्षणासाठी आले होते. आलेल्या ३०० लेखांमधून जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी यांच्या लेखाची निवड झाली.
सदर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या लेखासाठी संगीता कुलकर्णी यांना ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री अशोक बागवे यांच्या हस्ते *वाचन प्रेरणा पुरस्काराने* सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशासाठी विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

