You are currently viewing भारती विद्यापीठ इंग्रजी प्रज्ञाशोध परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलची चिन्मयी खानोलकर राज्यात तिसरी

भारती विद्यापीठ इंग्रजी प्रज्ञाशोध परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलची चिन्मयी खानोलकर राज्यात तिसरी

*भारती विद्यापीठ इंग्रजी प्रज्ञाशोध परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलची चिन्मयी खानोलकर राज्यात तिसरी*

दोडामार्ग

भारती विद्यापीठातर्फे सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी प्रज्ञाशोध परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग ने उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षीही राखली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी खानोलकर चिन्मयी जयसिंग हिने इंग्रजी ॲडव्हान्स्ड् परीक्षेत राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.
प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण 77 विद्यार्थ्यांपैकी 68 विद्यार्थी पास झाले. एकूण निकाल 88.31% लागला. पास झालेल्या 68 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी .एल. नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय पाटील सर , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षक श्री. अभिजीत उराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा