स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेमध्ये घवघवीत यश :**
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत प्रशालेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये, कु. रुद्र बापू मालवणकर, कु. कविश सावळाराम पेडणेकर, कु. गायत्री रघुनाथ तानावडे, कु. ऐश्वर्या सागर तेली, कु. सई सुधीर नाईक, कु. जान्हवी आनंद जानकर, कु. जान्हवी दत्तात्रय सावंत या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. कु. वरद संततुकाराम राणे, कु. गिरिजा सागर चव्हाण, कु. केवल श्याम मांद्रेकर, कु. निलया अजित शिंदे, कु. वरद नितीन सावंत, कु. पार्थ शैलेश मुंडये, कु. लिशा जगन्नाथ सावंत या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. तर, कु. आराध्य ज्ञानेश्वर शेटवे, कु. यज्ञेश राजेश पवार, कु. प्रजय जगन्नाथ सावंत, कु. नुवैरा मलिक सय्यद, कु. जान्हवी केशव तुळसकर, कु. आरूष मंदार वाडकर, कु. अद्वैत शशिकांत ठाकूर, कु. नुमान इम्रान नदाफ या विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली. तसेच, कु. यश्विनी विक्रांत खवणेकर हिने तृतीय श्रेणी प्राप्त केली. वरीलपैकी पन्नास पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे परीक्षेच्या पुढील सराकरिता म्हणजेच गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवडले गेले. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर व कु. झेबा बैग यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

