You are currently viewing करूळ चेक नाक्याजवळ कारचा अपघात

करूळ चेक नाक्याजवळ कारचा अपघात

करूळ चेक नाक्याजवळ कारचा अपघात;

लहान मुलाने अचानक स्टेअरिंग ओढल्याने दुर्घटना

करूळ :

करूळ येथील पोलीस चेक नाक्यानजीक रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता कारचा अपघात झाला. कार चालकाच्या शेजारी बसलेल्या लहान मुलाने अचानक स्टेअरिंग फिरवल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याबाहेरील गटारात धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही कार कणकवलीहून कोल्हापूरकडे जात होती. करूळ घाट मार्गे जात असताना चेक नाक्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

कारमधील सर्व प्रवाशांची पोलिसांनी विचारपूस केली असता, ते दुसऱ्या वाहनाने पुढे जाणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले. कारचालकानेही कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. या अपघातामध्ये सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा