You are currently viewing मुणगे कातकरी वस्तीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लॅंकेट व खाऊ वाटप

मुणगे कातकरी वस्तीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लॅंकेट व खाऊ वाटप

मुणगे कातकरी वस्तीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लॅंकेट व खाऊ वाटप

देवगड

मुणगे आडबंदर येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कातकरी वस्तीमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कारीवणे येथील पोलीस पाटील श्री. तुषार आडकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. रवीना मालाडकर आणि श्री. संतोष बांदेकर यांच्या सौजन्याने वस्तीतील ग्रामस्थांना ब्लॅंकेट आणि साखर वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

या प्रसंगी पोलीस पाटील तुषार आडकर यांनी लहान मुलांना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व पटवून देत शिक्षणाचे मोल समजावून सांगितले. “शिक्षणात कितीही अडथळे आले तरी शिकत राहा, संघटित व्हा आणि जीवनात उत्कर्ष साधा,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. शिक्षणाच्या प्रवासात कधीही मदतीची गरज भासल्यास आपण नेहमी सोबत राहू, असेही त्यांनी आश्वासन दिले.

या उपक्रमाबद्दल कातकरी वस्तीतील ग्रामस्थांनी तुषार आडकर, रवीना मालाडकर आणि संतोष बांदेकर यांचे मन:पूर्वक आभार मानले. समाजभिमुख कार्यातून महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा