You are currently viewing सावंतवाडीत ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चे यश — पहिले बाळ जन्माला
Oplus_16908288

सावंतवाडीत ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चे यश — पहिले बाळ जन्माला

डॉ. राजेश नवांगुळ यांच्या अत्याधुनिक IVF सेवेमुळे वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना नवी आशा

सावंतवाडी :

वंध्यत्वामुळे मानसिक तणाव अनुभवणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी सावंतवाडीतून उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. यशराज हॉस्पिटलमधील ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’मध्ये पहिले बाळ यशस्वीपणे जन्माला आले असून, अत्याधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञानातून झालेल्या या चिमुकल्या मुलीच्या आगमनाने माता-पित्यांचे स्वप्न साकार झाले आहे. या प्रक्रियेचे यश वंध्यत्वग्रस्त जोडप्यांसाठी नव्या आशेचे दार उघडणारे ठरले आहे, असे मत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांनी व्यक्त केले.

वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये सुरुवातीपासूनच अनेक रुग्णांवर प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार सुरु होते. अलीकडेच जन्मलेल्या या बालिकेमुळे सेंटरला पहिले मोठे यश मिळाले असून, रुग्णालय प्रशासनाने नवजात बालिकेचे तसेच तिच्या पालकांचे सत्कार करून आनंद व्यक्त केला.

या यशाबाबत बोलताना श्री नवांगुळ म्हणाले, “या सेंटरमधून मिळालेले पहिले यश आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. वंध्यत्वाने पीडित असलेल्या अनेक पालकांना आम्ही आशेचा किरण देऊ शकतो, हेच आमच्या कार्याचे खरे समाधान आहे.”

यशराज हॉस्पिटलमधील ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून जर्मनी व युरोपियन तंत्रज्ञानाधारित आयव्हीएफ व इक्सी मशीनरीने सुसज्ज आहे. या प्रक्रियेसाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर, भूलतज्ञ डॉ. मुक्तानंद गवंडळकर, एम्ब्रायॉलॉजिस्ट कपिल राईतूरकर आणि संपूर्ण स्टाफचे मौल्यवान सहकार्य लाभले.


सिंधुदुर्ग, गोवा, बेलगावी, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी हे सेंटर मोठे वरदान ठरले आहे. उत्कृष्ट उपचारांसाठी आता मुंबई किंवा गोव्याला जाण्याची गरज उरलेली नाही. स्थानिक पातळीवर परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान अनेक जोडप्यांच्या आयुष्यात सुखाचा किरण आणत आहे.

डॉ. नवांगुळ यांनी पुढे सांगितले की, “डॉक्टर मला आई व्हायचंय” ही या सेंटरची टॅगलाईन म्हणजेच रुग्णांप्रती आमची बांधिलकी आहे. बाळासाठी आर्ततेने वाट पाहणाऱ्या प्रत्येक जोडप्यापर्यंत ही सेवा पोहोचावी, हा आमचा प्रयत्न आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा