You are currently viewing वाभवे कोंडवाडीतील तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

वाभवे कोंडवाडीतील तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

वाभवे कोंडवाडीतील तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

वैभववाडी

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समाधान दिगंबर रावराणे वय 46 रा. वाभवे कोंडवाडी असे मृत विवाहित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

४ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत लाकडाच्या खोपीत ठेवलेले गवत मारण्याचे औषध प्राशन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्याला तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याने विषारी द्रव्य का प्रशन केले याचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा मोठा परिवार आहे.

गेल्या महिनाभरात वैभववाडी तालुक्यातील चार जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपलवले आहे. तरुण अशा प्रकारे आपले जीवन संपवत असल्यामुळे समाजात याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा