*निधनवार्ता*
आदर्श शिक्षिका
सौ. जयश्री राजेंद्र घावटे (वय ५८ वर्षे) यांचे रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता. महाराष्ट्र शिक्षक संघ, महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद, लायन्स क्लब आदी संस्थांनी त्यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव केला होता. पिंपरी चिंचवड शहरातील मराठी माध्यमातील इंग्रजी शिक्षक संघाच्या त्या संस्थापक पदाधिकारी होत्या. इंग्रजी विषयात त्यांची विद्यार्थिनी शालांत परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. नुकतेच सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथून पर्यवेक्षिका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. जेष्ठ व्याख्याते एन. के. उर्फ राजेंद्र घावटे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातू असा परिवार आहे. उत्कृष्ट शिक्षिका आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या सौ. जयश्री घावटे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

