You are currently viewing आरोग्य क्षेत्रामध्ये वाघ परिवाराचे एक पाऊल पुढे

आरोग्य क्षेत्रामध्ये वाघ परिवाराचे एक पाऊल पुढे

डॉ. कल्पना वाघ यांच्या डेंटल हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन

उमरगा :

उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, विद्याताई वाघ यांच्या सूनबाई डॉ. कल्पना निखिल वाघ त्यांच्या डेंटल हॉस्पिटलचे उद्घाटन मा. विश्वनाथ (अण्णा) तोडकर, अनिताताई तोडकर, सोबत उमरगा लोहारा तालुक्याचे लाडके आमदार प्रवीणजी स्वामी साहेब, रज्जाक अत्तार, तालुक्यातील विशेष मान्यवर डॉ. दीपक चव्हाण, डॉ. बेटदुर्गे, डॉ. शेख, डॉ. उदय मोरे, डॉ. खलंगरे साहेब पी एस आय भराटे, कैलास शिंदे, मदने सर येणेगूर, ज्योतीताई कावळे, डॉक्टर निकिता वाघ, आकाश सूर्यवंशी, विद्याताई वाघ, भूमिपुत्र वाघ, व्यंकट लादे, विशाल भोसले, सारिका लोंढे, बाळासाहेब लोंढे, पत्रकार मुल्ला साहेब, पत्रकार लक्ष्मण पवार, धीरज बेलंबकर, वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर वाघ डेंटल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी तालुक्यातील, शहरातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, मित्र आणि निमंत्रित पाहुणे निमंत्रित मित्रपरिवार, विविध सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील परिवार उपस्थित होते. आलेल्या सर्व बांधवांचे वाघ परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्या मारकड, अफसाना मुल्ला, संकेत लवटे, उमेश आबाचने, नितीन वाकळे, मैलारी शिरोळे, विजय टाकळे, अक्षय कामले यांनी परिश्रम केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा