*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृक्ष संवर्धनं…*
वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धन
काळाची गरज वृक्ष संवर्धन…
झाडे लावा लावा लाडे वाढवा हो
एक एक झाड एक माणूस हो
देती प्राणवायू प्राणाचे रक्षण
वृक्ष संवर्धन वृक्षसंवर्धन…
खतपाणी घाला वाढी लागतील
मूळ खोडं पान फुले बहरतील
देती सर्वस्व हो करती प्राणार्पण
वृक्ष संवर्धन वृक्षसंवर्धन…
घरादारात ते रानावनात ते
देती सावली नि दिसती सुंदर ते
पाळणाही त्यांचा आणि हो खेळणं..
वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धन…
त्यांच्या मुळे आपण जरा नाही खोटे
जडीबुटीमुळी औषधही भेटे
काय देती ना ते? पूर्ण संरक्षण..
वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धन…
वक्ष आई आहे, वृक्ष आहे बाप
नका तोडू तया नका करू पाप
वृक्ष न तोडण्याचा चला करू प्रण..
वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धन…
सरणावरती तेच येती फक्त
घेती जाळून ते, किती अनासक्त
सखा सोबती हो त्यांच्या सारखा न..
वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धन…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

