*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सीमोल्लंघन…माझ्या शब्दांचे…!!*
गावाची हद्द ओलांडली
शब्दचं उच्चार बदलतात
कडू कारलं …शब्दांच
साखरेत घोळत बसतात..
सुहास्य मुद्रा..मायमराठीची
हसून हसून.. पोट दुखतं
शब्दांचा.. ..माइंडफूल आस्वाद
मैलामैलांवर.. हमखास लाभतं..
.
आपली स्वप्नं …आपलीच
शब्दचं..दुस-यांची स्वप्नं जगतात
परिवर्तनाची झालर अर्थांना
कक्षा स्वप्नांची …रूंदावतात..
सीमोल्लंघनात.. शब्दांना गती
थांबवता… ….येत नाही
ज्ञानेश्वरांचा.. चिद्विलासवाद
मायमराठीला परिसिमा नाही..
आत्मपरिक्षणाचा न्याय शब्दांना
मनाची…श्रीमंती दाखवावी
परिक्षेत्राची प्रतारणा करता..करता
आभासी सीमारेषा ओलांडावी
बाबा ठाकूर

