*परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन साजरा.*
कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन आदरपूर्वक साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. रमाकांत गावडे (करियर कट्टा तालुका समन्वयक, गोगटे–वाळके महाविद्यालय बांदा) आणि प्रा. नितीन बांबर्डेकर (मानसशास्त्र अभ्यासक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व) यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना योग्य जीवनमूल्यांची दिशा दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.सचिन पाटकर उपस्थित होते. त्यांनी भाषणात सांगितले की, “बाबासाहेबांचे अनुकरण करणे सोपे नाही; पण त्यांनी दिलेले संविधान, त्यांचे विचार आणि ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हे तत्त्वज्ञान जिवंत ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागप्रमुख प्रा. भक्ती चव्हाण, सहाय्यक विभागप्रमुख प्रा. अंकिता नवार, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक प्रा.भक्ती चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रामदास पास्ते यांनी केले.
▫️ महामानवाच्या विचारांना अभिवादन…
▫️समाजघडणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल…


