*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“मला तोडू नका”*
*(एका झाडाचं मनोगत)*
मला तोडू नका मी काही थोर नाही,
मी फक्त निसर्गाच्या कुशीत जन्मलेलं
एक साधं,हळवं,श्वास देणारं प्राणवंत आहे.
मी काय उभा असतो शांत
तुमच्या धावत्या जगाला सावलीची मिठी देतो,
रखरखत्या उन्हाचा ताप कमी करत,
सैरभैर पाखरांना विसाव्यासाठी कवेत घेतो
माझ्या प्रत्येक पानात
तुमच्यासाठी श्वास आहे,
माझ्या प्रत्येक फांदीत आश्रय आहे,
आणि माझ्या मुळांमध्ये
धरतीची नाळ आहे…
तरीही मी अनेकदा मी पडतो
पाडला जातो
लोभाच्या कुर्हाडीखाली
नि:शब्द होऊन तोडला जातो
वादळ वारा ऊन पाऊस
विज अंगावर घेत मी उभाच रहातो
दमलेल्या थकलेल्या देहाला
गारवा मिळावा म्हणून
तरीही घाव घालून मी जखमी होतो
पण वेदना माझ्या कुणाला कळत नाही
कारण मला बोलता येत नाही
तुम्ही म्हणता प्रगती झाली
पण प्रगती झाली फक्त
सिमेंट विटांच्या उंच उंच घरांची
माझी वंशावळ नष्ट करून
वनराई बेघर केली
सारी सृष्टीची राख झाली
मी नाहीसा झालो,
तर स्वच्छ हवा मिळणार नाही
धूर वाढेल,पाऊस रुसून बसेल,
वेदना धरणीला छेद देईल.
माझा प्रत्येक पडलेला देह
पृथ्वीच्या भविष्यावर उमटलेली एक खोल जखम होईल.
म्हणून…
मला तोडू नका.
मला वाढू द्या.
मला जपू द्या.
तुमच्या मुलांच्या हसण्यात
मी सावली बनून राहीन,
तुमच्या उद्याच्या आकाशात
मी स्वच्छ श्वासाची खात्री बनून राहीन.
झाडं वाचवा
कारण माझं जीवन म्हणजेच
तुमच्या जगण्याची हिरवीशार नवीन पहाट आहे 🌿🌍💚
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४६
९४२८९२६८
