You are currently viewing संमत्ती दिली आणखी एकास

संमत्ती दिली आणखी एकास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संमत्ती दिली आणखी एकास*

(730)

येऊन जन्माला आपण

करतो बेरीज नात्यांची

गुंतत जातो मित्रांच्यात

होते कसरत तारेवरची……

 

सांभाळताना तोंडी फेस

तरी जन्माला मुले घालतो

बेरजे ऐवजी *गुणाकार*

करून आपण *थकतो*……

 

कैलासवासिंची *वजाबाकी*

फारसा फरक *नाही पडत*

मित्रमंडळी व्यवसाय बंधुंची

भर कांही नाही *बिघडवत*………

 

काडी पडून डोंगरावरती

शिखरे कुठे कोलमडतात

नात्यागोत्याची *गुंतागुंत*

झेन पिढीला कुठे झेपतात…….

 

नॅनो संस्कृती जपताजपता

लोक संख्येचा होतो -हास

चीनने काढले बंधन आता

*संमत्ती दिली आणखी एकास*

 

बघत रहायचे आता आपण

परिवर्तन होणारे *पृथ्वीवर*

*आयुष्याची वजाबाकी*

सूड उगवणार नव्या पिढीवर

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा