You are currently viewing गुलाबी थंडीचा नजारा

गुलाबी थंडीचा नजारा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गुलाबी थंडीचा नजारा*

 

शरद सुंदर चंदेरी राती, माडाच्या बनात येना या गाण्याचे धुंद स्वर कानी पडताच, शरदाचे चांदणे आठवले. शरद ऋतु मधील गारवा, धुक्यात हरवलेल्या वाटा, आणि थंडगार वाक्याची अंगावर शहारे आणणारी ती थंडी. वार्षिक ऋतुचक्रातील तिसरा ऋतू हा गहिर्य गुलाबी थंडीचा. हिवाळा , बोचर्या थंडीचा असला तरी उबदार

शालीने पांघरणारा. लोकरीच्या मुलायम कपड्यांची उब देणारा. हिवाळा सर्वांनाच आवडतो.

नोव्हेंबर ला थोडीशी चुणूक दाखवित डिसेंबर पासून हळूहळू गडद धुक्यात हरवत जाणारा थंडीचा गहिरा नजारा आपली बोबडी वळवतो. तरुणाई आणि मुलांना मात्र हिवाळा अधिक उर्जा प्रदान करतो. डिसेंबर ते फेब्रुवारी ला हिवाळ्याची तीव्रता भारतात अधिक जाणवते.

२१ किंवा २२ डिसेंबर रोजी उत्तर गोलार्धात सूर्यापासून सर्वात दूर असतो, जेव्हा पृथ्वीचा अक्ष दुसरीकडे निर्देशित होतो तेव्हा हिवाळा

प्रकर्षाने जाणवतो. हिवाळ्यात अनेक सण येतात, तशी दिवाळी पासूनच थंडी जाणवायला सुरुवात होते.

हिवाळ्यात अनेक उत्सव, सण येतात. दत्त जयंती चा उत्सव .

लोकरी, पोंगल, मकरसंक्रांत, छठपूजा, ख्रिसमस, छठपूजा.

हिवाळ्यात कापणीच्या हंगामाला विशेष महत्व दिले जाते. धार्मिक महत्त्व, सांस्कृतिक परंपरा सूर्य देवाचे आभार मानणारे सण, तसेच होळीचा महत्वाचा सण. होळी नंतर थंडीचे प्रमाण कमी होते.

 

गुलाबी थंडी, शहारणारी, हवीहवीशी वाटणारी, अनेक लोकांना थंडीतला गारवा आवडतो. उबदार शालीतली गुलाबी थंडी . उन्हाळ्याच्या तापटपणा आणि पावसाळ्याच्या खट्याळ पणा पेक्षा थंडीतला गारवा आवडतो.

त्या गारव्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी उबदार पणाची सुंदर आकर्षक लोकरी वस्त्र आपण पांघरतो. आणि थंड वातावरणात सुद्धा सुखद उबदार पणाचा अनुभव घेतो.

मुंबईतल्या तुडुंब गर्दीत मात्र

त्या मानाने थंडीचा तडाखा जाणवत नाही, पण उत्तरेकडच्या जनतेला मात्र थंडीशी मुकाबला करावा लागतो. पाश्चिमात्य प्रदेशातील लोकांना तर कायमच थंडी पासून स्वसंरक्षण करावे लागते.

बर्फाच्छादित प्रदेशात तर ते लोक कसे रहात असतील देवच जाणे. काश्मीर, बर्फाळ प्रदेशात भयानक थंडीत ते लोक कसा काय मुकाबला करत असतील कोण जाणे?

मला तर इथलीहीथंडी सहन होत नाही.

शरद ऋतूतील गारवा, त्या गारव्यातील सुंदर चांदणे, पौर्णिमेचा चंद्र, ते शीतल चांदणे,

अशा वातावरणात थंडगार हवेचा आस्वाद घ्यायला तरुणाईला फार आवडते.

पर्यटक मुद्दा म सहली आयोजित करतात. शाळा

काॅलेजात हिवाळी सहली निघतात. त्यावेळी आठवते अगदी डोक्यापासून पायापर्यंत

संरक्षक कवच घातल्यासारखा जामानिमा असायचा. शाळेत शिक्षक असतांना शाळेच्या हिवाळी सहली, स्नेहसंमेलने, सायन्स एक्झिबिशन, क्रीडा महोत्सव हे दरवर्षी असायचे.

मुलांना या गोष्टीत खूप उत्साह असायचा.

निसर्ग सौंदर्याचा तर आविष्कारच वेगळा, तो धुक्यात हरवलेला आगळा नजारा दिसायचा. गुलाबी थंडीत, धुक्याची शाल पांघरलेले डोंगर, तो आसमंत असा धुंदिवलेला, फळाफुलांनी बहरलेली वसुंधरा, तिच्यावर ही धुक्याची शाल पांघरलेली, प्राची च्या रम्य वेळी अंधुकसा

राखाडी धुक्याचा पडदा सारुन हळूच कधी कधी उन्हाचे कवडसे स्वतः ची वाट शोधायचे. अंधुक प्रकाशात धडपडणारा प्रवास. गारठलेला जीव मुठीत घेऊन केलेल्या त्या सहली आठवल्या की, अजुनही शहारे येतात. माझ्या मुलींनी त्या वैष्णवी देवीला गेलेल्या सहलीचे वर्णन ऐकतांना तर मी जागीच गोठू लागते की काय असे वाटले.

मी पाहिलेल्या पूर्वीच्या चित्रपटात थंडी तल्या गाण्यांची ती दृश्ये, ती निसर्ग रम्य दृश्ये फारच विलोभनीय वाटायची. बर्फाळलेली घरे डोंगरशिखरे

त्या फळाफुलांनी बहरलेल्या बागा सारेच विलोभनीय वाटायचे. माझी आत्या तिच्या मैत्रिणीबरोबर मला कधीकधी

सिनेमाला घेऊन जायची, त्यावेळी तेवढेच कधीतरी करमणुकीचे साधन असायचे.

आता जवळजवळ पसतीस वर्षे तरी थिएटरमध्ये सिनेमा पाहिलेला आठवत नाही.

टीव्ही चे माध्यम घरात असल्याने, नोकरी, क्लास, संसार ,रहाटगाडग्यात अडकल्याने आठवण नाही, पण टीव्हीवर निसर्ग दृश्ये पहाताना खूप सुंदर प्रसन्न वाटते .

हिवाळ्यात संत्री, मोसंबी,आवळा ,पेरु, चिकू, सफरचंद, स्ट्रॉबेरी ,बेरीफळे,

डाळिंब, सीताफळे यांचा हंगाम असतो. तसेच फुले रंगीबेरंगी गुलाब, वेगवेगळ्या रंगाच्या शेवंती ,ऑस्टर, झेंडू, मखमली कोंबड्याची फुले, अबोली, जास्वंदी, हेलेबोर, स्नोड्राप्स, कॅमेलिया तसेच फळभाज्या, पालेभाज्या, शेंग भाज्या यांची

भरभराट असते.

खूप सुंदर नैसर्गिक स्रोत असतो. संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी मी भरपूर फळे, फुले, भाज्या आणून

रांगोळी, आणि फ्रुट, फ्लाॅवर,

व्हेजीटेबल यांचे डेकोरेशन

करायची, तीळगूळाचे लाडू, चिकी घरीच बनवायची.

आणि माहेरी मस्त थंडीच्या दिवसात वाड्यात उकडहंडी पोपटी बनवायचो.

एकदा शाकाहारी पालापाचोळा, काटक्या एक मोठा खड्डा खणायचा , मोठ्या मडक्यात वालपापडी, हरभरे,मटार, भुईमुग शेंगा, रताळी, बटाटे ओल्या हळदीचे दोन चार तुकडे. नारळाचेतुकडे,ओवा,मीठ मिरच्या,कांदे ,मडके केळीच्या पानाने बंद करुनीउलटे ठेवून दिवसभर शेकत ठेवायचे.

तसेच रविवारी नाॅनव्हेज

चिकन, मटन, कोळंबी , अंडी वगैरे. हिवाळी अधिवेशन असे रंगते.

 

बहरण्याआधी होते पानगळ

झाड आपले जीर्ण वस्त्र

बदलून

येते कोवळी नवी पालवी लेऊन

थंडीच्या दिवसातले कुडकुडणारे, बोचरे क्षण

पण जेव्हा निसर्ग सौंदर्याने बहरतात तेव्हा खूप हवेसे वाटतात.

 

असो. लेख वाढत चालला, थंडी संपून उन्हाळा येईल

म्हणून आवरते घेते.

 

थंडी ही वाढत चालली आहे.

कोंबड्यांनी बांग द्यायला सुरुवात केली आहे.

 

सर्वांना हिवाळी शुभेच्छा.

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कला शिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा