*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बहीणाबाई चौधरी*
माझी माय बहिणाबाई
नाही शाळा शिकलेली
तिच्या हृदयात स्वत:
देवी शारदा नांदली
जन्म गरीब घरात
मोठी झाली बहिणाई
राना वना साद घाली
गोड गळ्यात ती गाई
बाल विवाह तो झाला
गेली सासरी नांदाया
गरीबाची पोर म्हणून
चिडवती आया बाया
स्व रचित ती ओवी
चुल फुकतांना गाई
नाही लिहून ठेवल्या
अडाणी माझी आई
रस्त्याने चालताना
बोले केळी कर्दळीशी
उभी माय कशी तु
लेकुरवाळी रंभा जशी
अडाणी माझी माय
किर्तीवान या भुवरी
नाही लिहिले, वाचले
गाणे शंभर नंबरी
अडाणी माझ्या आईची
गोष्टच अवचित
माझ्या मायेचं कौतुक
नाही झालं प्रकाशित
*शीला पाटील. चांदवड.*

