पूजा-अर्चा, नवस व दशावतार नाट्यप्रयोग
सावंतवाडी/ बांदा :
डिंगणे ग्रामदेवता श्री देवी सातेरी व माऊली देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी, ता. ७ डिसेंबरला उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी श्री देवी सातेरी-माऊलीची पूजा-अर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे अशा धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल.
सायंकाळपासून जत्रोत्सवाचा उत्साह वाढणार असून रात्री पालखी प्रदक्षिणा काढण्यात येईल. मध्यरात्री नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सर्व भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी सातेरी-माऊली देवस्थान समिती, मानकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

