धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
सावंतवाडी :
कारिवडे ग्रामदेवता श्री देवी कालिका, रवळनाथ, पावणाई पंचायतन देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (६ डिसेंबर) उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्री देवी माऊलीची पूजा-अर्चा व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे यांसारखे पारंपरिक विधी करण्यात येणार आहेत.
सायंकाळपासून वातावरण अधिक रंगणार असून रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशीरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक सादर केले जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामवासी, देवस्थानाचे मानकरी, स्थानिक देवस्थान उपसमिती अध्यक्ष बाबा गावकर, खजिनदार व मानकरी शुभम गावकर तसेच देवस्थान समितीचे सचिव दत्ताराम गावडे यांनी केले आहे.

