You are currently viewing ६४ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : मुंबई केंद्रातून ‘ती, ती आणि ती’ प्रथम; ‘ब्रेकपॉईंट’ द्वितीय

६४ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : मुंबई केंद्रातून ‘ती, ती आणि ती’ प्रथम; ‘ब्रेकपॉईंट’ द्वितीय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा – मुंबई केंद्राचे निकाल जाहीर झाले असून सहप्रमुख कामगार अधिकारी शहर या संस्थेच्या ‘ती, ती आणि ती’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. सेजल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘ब्रेकपॉईंट’ या नाटकाने द्वितीय, तर युटोपिया कम्युनिकेशन्सच्या ‘मिसेस हिटलर’ या नाटकाने तृतीय पारितोषिक मिळवले आहे. यातील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे —

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक : नम्रता काळसेकर (ती, ती आणि ती), द्वितीय पारितोषिक : प्रितेश सोढा (मिसेस हिटलर), तृतीय पारितोषिक : सागर माने (ब्रेकपॉईंट)

प्रकाश योजना : प्रथम : शाम चव्हाण (ती, ती आणि ती), द्वितीय : जयदीप आपटे (मिसेस हिटलर), तृतीय : संजय तोडणकर (कोणाच्या खांद्यावर)

नेपथ्य : प्रथम : रजनीश कोंडविलकर (दानव), द्वितीय : यश मोडक (ब्रेकपॉईंट), तृतीय : प्रदीप पाटील (आम्ही आनंदयात्री)

रंगभूषा : प्रथम : वर्षा जाधव (ब्रेकपॉईंट), द्वितीय : अनिल कासकर (दानव), तृतीय : सुनिल रघुनाथ (गाडी चुकली आणि)

संगीत दिग्दर्शन : प्रथम : अक्षय जाधव (ती, ती आणि ती), द्वितीय : ओजस भट (मिसेस हिटलर), तृतीय : महेंद्र मांजरेकर (दानव)

वेशभूषा : प्रथम : चंचल शिंदे (ब्रेकपॉईंट), द्वितीय : रुपेश नामये (जगद्गुरु तुकोबाराय), तृतीय : मंदार तांडेल (सोन्याचा पिंजरा)

उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक : अरुण कदम (कोणाच्या खांद्यावर), सेजल कांबळे (दानव)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : सुचीत ठाकूर (मोक्षदाह), सुमित घाग (ब्रेकपॉईंट), श्रीकांत मोरे (आमच्या या घरात), सौरभ इसवारे (गेली एकवीस उंट), आशिष जोशी (मिसेस हिटलर), डॉ. यशश्री कंटक (शनिवार रविवार), मानसी नाटेकर (मिसेस हिटलर), नयना पवार (अथांग), अलका फोन्सेका (ढोलताशे), कल्पना भिसे (सोन्याचा पिंजरा).

दि. ७ नोव्हेंबर २०२५ ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अत्यंत जल्लोषात झालेल्या प्राथमिक फेरीत २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून चंद्रशेखर बेंद्रे, कैलास टापरे आणि सरिता अनिरुद्ध यांनी कार्यभार सांभाळला.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त नाटके आणि कलाकारांचे कौतुक करत आगामी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्थांनी उपजत प्रतिभा आणि नाट्यकलेबद्दलची निष्ठा यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले असून प्रेक्षकांनीही या दर्जेदार नाटकांना उत्स्फूर्त दाद दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा