सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल आयोजित जागतिक दिव्यांग दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेमार्फत जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा रोजगार व्यवसाय शासकीय योजना कायदेविषयक मार्गदर्शन केले गेले. शिक्षण,आरोग्य, समाजसेवा, देश संरक्षण पर सेवा समाज प्रबोधनपर सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधवांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम बॅरिस्टर नाथ पै सेवांगण हॉल मालवण या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री. रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री.श्याम चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पांडुरंग सावंत, विस्तार अधिकारी श्री.विनायक जाधव, मालवण चे प्रांताधिकारी सौ.ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सौ. सुप्रिया परब, विधी व सेवा समिती मालवण ॲडव्होकेट श्री.अक्षय सामंत व सौ.प्राजक्ता गावकर, मातृत्व फाउंडेशन संस्था अध्यक्ष श्री. संतोष लुडबे, सेक्रेटरी श्री.दादा वेंगुर्लेकर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण चे कार्याध्यक्ष श्री.लक्ष्मीकांत कुबरेकर, अपंग वित्त महामंडळ आरोस पदाधिकारी श्री.नितीन परब, महात्मा फुले महामंडळ ओरोस श्री. विठ्ठल आरे नवरू, माजी नगराध्यक्ष श्री.महेश कांदळगावकर, सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसा या संस्थेचे संस्थापक श्री. अनिल शिंगाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी क्रेस्टा व्हिजन स्टुडिओ श्री.विजय कुडाळकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वेबसाईट चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांगांना कायदेविषयक माहिती व शासनाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र खेबुडकर यांनी आपल्या मनोगतातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या त्यांच्यासाठी शासनाकडे आलेला निधी, शासनाकडून दिव्यांगांना दिल्या गेलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेतला शिलाई मशीन घरघंटीच्या माध्यमातून कितपत रोजगार निर्मिती होते या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. आपण दिव्यांगांसाठी असणाऱ्या सेवा सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्या साठी कार्य तत्पर आहोत त्यासाठी आपण सुद्धा एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे व सेवा सुविधांचा योग्य वापर करून आपण स्वावलंबी पाहिजे. मालवणच्या तहसीलदार सौ.सुप्रिया परब यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांगांसाठी शासनाकडे असणाऱ्या सेवा सुविधा योजना आपण तळागाळापर्यंत पोहोचवून, त्यांच्या साठी आपण सदैव कार्यतत्पर आहोत अशी ग्वाही दिली.
समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधू-भगिनींचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये सौ. रश्मी रमेश हर्णे यांना जिल्हास्तरीय दिव्यांग पालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री.मंदार सदाशिव चोरगे शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना जिल्हास्तरीय सिंधुरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री.विश्वास दत्तराम मुळम अंधत्वावर मात करून समाजामध्ये करत असलेली सेवेसाठी जिल्हास्तरीय दिव्यांग यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री.राजेंद्र दत्ताराम खोत शिक्षण क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय आदर्श दिव्यांग शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री.श्रीधर विष्णू पोवार सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग नगरी येथे वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. श्रद्धा विप्रदास कदम माऊली महिला मंडळ संचलित कर्णबधिर मतिमंद विद्यार्थ्यांची शाळा त्या चालवतात दिव्यांग प्रति केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय दिव्यांग महिला अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. श्री.बाबुराव शंकर गावडे राष्ट्रीय दृष्टीहीन विभागीय शाखा कोकण महासंघाचे अध्यक्ष दिव्यांग प्रती करत असलेल्या कामाची दखल घेत जिल्हास्तरीय आदर्श दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. सौ.रेवा सुजित कदम यांनी स्पर्शज्ञान,ब्रेन पाक्षिक मध्ये व डेअरी व्यवसायासोबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून करत असलेली सामाजिक प्रगती बाबत कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय सिंधुरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री.उदय राम बुटे व्यवसायामध्ये केलेले वृद्धी व समाजामध्ये व्यवसाय वाढीसाठी करत असलेले प्रयत्न याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री.आनंद शंकर दामोदर सरपंच या पदावर असताना त्यांनी केलेले काम व सामाजिक विकास याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री.सत्यम भगवान पाटील स्वतः दिव्यांग असून मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय चालवतात दिव्यांगांसाठी विविध प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यांच्या या महानकार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सौ.अर्चना अनंत लाड ग्रामपंचायत अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय उत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री.मच्छिंद्र नागनाथ सूर्यवंशी शिक्षण कला क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श दिव्यांग कलाकार पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. श्री.गणेश यशवंत बेर्डेकर तरुण वर्गाला व्यवसाय क्षेत्रात वळवून स्वावलंबी बनविणे, या कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सौ .अनुराधा रमेश पाटकर अंगणवाडी सेविका म्हणून बजावत असलेली भूमिका व विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करून पुढील शिक्षणासाठी भविष्यासाठी विद्यार्थी घडवणे या कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी उत्तम सेवा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.सौ.अर्चना हरिश्चंद्र तळवडेकर आशा सेविका म्हणून करत असलेले कार्य त्याचबरोबर कोरोना काळात केलेले महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना जिल्हास्तरीय उत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री प्रसन्ना देसाई सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सौ.फॅनी फर्नांडिस माय माऊली महिला सबलीकरण संस्थापक आणि मातृत्व फाउंडेशनच्या पदाधिकारी असून करत असलेल्या कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. क्रेस्टा व्हिजन स्टुडिओचे श्री.विजय कुडाळकर व परिवार यांचा सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अहवाल वाचन कु.विशाखा कासले यांनी केले प्रास्ताविक श्री.अनिल शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.दयानंद गावकर यांनी केले.
