You are currently viewing भेडशी ग्रामपंचायतीचा ठराव रद्द; न्यायालयाचे दुकाने उघडण्याचे आदेश

भेडशी ग्रामपंचायतीचा ठराव रद्द; न्यायालयाचे दुकाने उघडण्याचे आदेश

भेडशी ग्रामपंचायतीचा ठराव रद्द; न्यायालयाचे दुकाने उघडण्याचे आदेश

अॅडव्होकेट्स डेच्या दिवशी आदेश मिळाल्याने कायदे व्यवसायातील अभिमान वृद्धिंगत

भेडशी :

गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडथळा आणणारा ग्रामपंचायतीचा ठराव माननीय न्यायालयाने रद्द केला असून, संबंधित दुकाने तात्काळ डि-सील करून अर्जदारांना त्यांच्या व्यवसायास पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायतीने पारित केलेल्या ठरावानुसार अर्जदारांना गावातील व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले होते. याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्रशासनाच्या अशा कारवाईला मनमानी ठरवत अर्जदारांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केले.

या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने कामकाज अॅडव्होकेट अभिजीत तांबे यांनी पाहिले. त्यांनी सांगितले की, हा आदेश संविधानातील मूल्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण असून, “अॅडव्होकेट असल्याचा अभिमान अधिक दृढ करणारा” आहे.

विशेष म्हणजे हा निर्णय अॅडव्होकेट्स डे च्या दिवशी मिळाल्याने कायदे व्यवसायातील अनेकांचे भावना अधिक उंचावल्या. अॅडव्होकेट अभिजीत तांबे यांनी संविधानाचे रक्षण आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा