You are currently viewing गणेश नाईक यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरीय निवड

गणेश नाईक यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरीय निवड

*गणेश नाईक यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरीय निवड*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५ शिक्षकांची निवड*

वेंगुर्ले तालुक्यातील कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांची आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरीय निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून यावर्षी प्रथमच प्राथमिक शिक्षकांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरिता योगदान देणाऱ्या राज्यातील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांची राज्यस्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ शिक्षकांची राज्यस्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी गुरुवार, ४ डिसेंबर रोजी रोजी छत्रपती संभाजीनगर निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिर येथे राज्यातील आयडॉल शिक्षकांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा व विद्यार्थी विकासाकरिता योगदान देणाऱ्या या आयडॉल शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी, तसेच शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेश नाईक यांचे शाळा व्यवस्थापन समिती मार्फत अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा