*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जपून टाक पाउले*(पादाकुलक ८+८मात्रा)
उमलतेस तू बाले आता
तेज मुखावर तुझ्या विलसते
*मंतरलेले क्षण सोनेरी*
उषःकालची प्रभा फाकते…..१
अंतरात तव उर्मी उठती
सागर लहरींपरी उसळती
क्षण सोनेरी मंतरलेले
स्वप्ने तुजसी किती दावती…..२
बाग बगीचा फुलला आहे
काटेरी पण कुंपण आहे
टाक पाउले जपून बाळे
सांभाळुनिया सदैव राहे…..३
तारुण्याची नशा आगळी
धुंद मनासी मोहविणारी
तोल सावरी क्षणाक्षणाला
नको जीवना नासविणारी…..४
*मंतरलेले क्षण सोनेरी*
मधुकण सारे प्राशन कर तू
राजहंस तू बनुनी युवती
क्षीर नीर हा विवेक धर तू…..५
*अरुणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
०११२२०२५
