*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*करावेच लागेल*
मला हे करावेच लागेल
कोण खरे कोण खोटे
हे नीट पहावेच लागेल
मन पक्के करावे लागेल
वय लागले उतरणीला
मन पक्क करावे लागेल
संसारातुन लक्ष काढून
पेइंग गेस्ट सारखं राहावं लागेल
आपलं मन ताब्यात ठेवून
इतरांचे ऐकावे लागेल
स्वतःचे मत मांडण्यापेक्षा
दुसऱ्यांना मान द्यावा लागेल
भावनांना आवर घालून
मला शांत राहावे लागेल
उर्वरित आयुष्यातील सुखासाठी
मला हे करावेच लागेल
प्रतिभा पिटके
अमरावती
