You are currently viewing कृषि विषयक महत्वाचा लेख 

कृषि विषयक महत्वाचा लेख 

कृषि विषयक महत्वाचा लेख  5 डिसेंबर जागतिक मृदा दिन

 चला माती परिक्षण करुया

 आपली जमीन समृध्द करुया

जागतिक माती दिन अर्थात जागतिक मृदा दिन  दरवर्षी 5 डिसेंबर रोजी  साजरा केला जातो. मातीचे संवर्धन, सुपिकता तिच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या दिवासाचा उद्देश आहे. मूलभूत जगण्यासाठी अन्नाची आवश्यता आहे. ती गरज मातीतून पिकणाऱ्या अन्न धान्यामुळे पूर्ण होते. जमिनीमधील मातीचे परिक्षण करुन योग्य पध्दतीने उत्पादन घेतले तर पिकांचे उत्पादन वाढेल. शेतातील माती निरोगी असेल तर समृध्द शेती होईल. त्यासाठी मातीचे परिक्षण करुन समृध्दता वाढविण्यावर भर दिला  जात आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात तुमच्याकडे जमीन आहे. तर तुम्ही माहिती परीक्षण केले पाहिजे, चला! आपली माती आणि तीची पत जाणून घेऊ या !

मातीचे महत्व

अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा माती शिवाय पुर्ण होवू शकत नाही. माती विना शेती होवूच शकत नाही त्यामुळे निरोगी माती ही समृध्द शेतीसाठी अत्यंत आवश्क आहे. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली, तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करता येत नाही, हे वास्तव आहे. 10 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात त्यामुळे मातीचे महत्व खूप आहे.

माती संवर्धन– काळाची गरज

आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापलेला असून ही जैवविविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी साठविण्याची आणि शुध्द करण्याची क्षमता आहे, तसेच पूर व दुष्काळ या सारख्या संकटालाही मातीमुळे मात मिळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा