You are currently viewing संविधान दिनानिमित्त रेडिओ एफ् टी आय आय ९०.४ वाहिनीवर विशेष काव्य जागर

संविधान दिनानिमित्त रेडिओ एफ् टी आय आय ९०.४ वाहिनीवर विशेष काव्य जागर

निगडी,पुणे –

नुकतेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया -पुणे अंतर्गत रेडिओ एफ् टी आय आय ९०.४ एफ् एम वाहिनीवर संविधान दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संस्थेचे प्रमुख संचालक विश्वास नेर्लेकर सर, स्टेशन मॅनेजर अनुराधा वजिरे मॅडम,निर्देशिका नीता तुपारे मॅडम यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली जेष्ठ साहित्यिक व नाट्य चित्रपट दिग्दर्शक श्री अशोक भगवंत वाघमारे यांच्या संकल्पनेतून नुकताच ध्वनिमुद्रित करण्यात आला.

संविधान दिनी सदर कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीने प्रथम संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कविता सादरीकरण केले.

यात डॉ जयद्रथ आखाडे, सिंहल मेंढे, अशोक सोनवणे,अरूण घोडके, दिव्या भोसले, सुनिता घोडके, सविता भोकरे कांबळे, अशोक वाघमारे यांनी अतिशय उद्बबोधक व बहारदार रचना सादर केल्या.

या कार्यक्रमाचे निवेदन डॉ जयद्रथ आखाडे यांनी करुन संपूर्ण एफ् टी आय टीमचे तसेच सर्व सहभागी साहित्यिकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा