You are currently viewing काव्यात्मा साहित्य परिषद,पुणे तर्फे ज्येष्ठांचा पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रित काव्यसंमेलन संपन्न

काव्यात्मा साहित्य परिषद,पुणे तर्फे ज्येष्ठांचा पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रित काव्यसंमेलन संपन्न

पुणे / पिंपळे गुरव:

काव्यात्मा साहित्य परिषद,पुणे तर्फे रविवार दिनांक ३०/११/२०२५ रोजी,मराठवाडा जनविकास संघ,पिंपळे गुरव येथे ज्येष्ठांचा पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन संपन्न झाले.१५ मार्च २०२३ रोजी काव्यात्मा साहित्य परिषद,पुणेची स्थापना श्री आत्माराम हारे सरांनी केली.समूहातर्फे दरवर्षी विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात असते.यावर्षी ज्येष्ठांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.प्रतिमा काळे व श्री.अनिल नाटेकर सर,प्रास्ताविक श्री आत्माराम हारे सर,आभार श्री.दादाभाऊ ओव्हाळ सर,तर सुंदर असे स्वागतगीत श्री.अनिल नाटेकर सरांनी सादर केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगारभूषण श्री राजेंद्र वाघ सर,पुरस्काराचे शुभहस्ते वितरण महाराष्ट्र कामगार परिषदेचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम सदाफुले सर,विशेष उपस्थिती वृक्षमित्र अरुण पवार सर,कवी व गायक मदन देगावकर सर,ज्येष्ठ पत्रकार,शिव व्याख्याते,लेखक श्री संदीप तापकीर सर,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रा.महादेव रोकडे सर,ज्येष्ठ साहित्यिक आप्पा कसबेकर सर होते.कार्यक्रमात श्री.बाबूजी डिसूजा: काव्यात्मा साहित्य सेवा पुरस्कार,२०२५,श्री. बा.ह.मगदूम:काव्यात्मा आनंदभक्ती सेवा पुरस्कार,२०२५,श्री. दिपक अमोलिक :काव्यात्मा शब्द सारथी सेवा पुरस्कार,२०२५,श्री.अमित किशोर केदारी: काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार,२०२५.याच सोबत ३० निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यात विविध विषयांवर काव्यरचना सादर करण्यात आल्या.कवी राजेंद्र वाघ,मदन देगावकर,डॉ.महादेव रोकडे,आत्माराम हारे,अनिल नाटेकर,बाबू डिसूजा ,बा.ह. मगदूम, दिपक अमोलिक,अमित किशोर केदारी,लक्ष्मण शिंदे,धनंजय इंगळे,मिलिंद शेंडे,आनंद गायकवाड,अशोक सोनवणे,अशोक वाघमारे,जयद्रथ आखाडे,उमेंद्र बिसेन,दादाभाऊ ओव्हाळ,राजू जाधव,प्रभाकर वाघोले,अरुण कटारे,प्रशांत पाटोळे,अरुण घोडके,मच्छिंद्र झुरुंगे,संभाजी रणसिंग,विजय जाधव,कवयित्री प्रतिमा काळे, योगिता कोठेकर,मेहमुदा शेख,सौ.डिसूजा,सुनिता घोडके इत्यादी कवींचे बहारदार काव्य सादरीकरण झाले.अध्यक्षीय भाषणात वाघ सरांनी काव्य आपले सामाजिक विषयावर भाष्य करणारे असावे,काव्य सादरीकरण करतांना कोणतीही प्रस्तावना करू नये.आणि सर्वांचे सुंदर असे छायाचित्र राहुल जाधव सरांनी काढले व त्यांनी आत्माराम हारे सरांना प्रस्तावना प्रतिमा सप्रेम भेट म्हणून दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा