You are currently viewing “सावंतवाडीला भाजपमय करूया!” — विशाल परब यांचे आवाहन

“सावंतवाडीला भाजपमय करूया!” — विशाल परब यांचे आवाहन

“नॉन-करप्टेड नगराध्यक्ष देण्याचा विश्वास; २५ वर्षांच्या ठप्प विकासाला आता गतिमान करू” – पत्रकार परिषदेत परब यांची भूमिका

सावंतवाडी :

देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. सावंतवाडीतही सत्ता हवी आहे. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक ‘नॉन-करप्टेड’ असतील‌‌. शहराचा विकास साधण्यासाठी संपूर्ण सावंतवाडीला ‘भाजपमय’ कराव असं आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‌

आमचे नगराध्यक्ष हे ‘नॉन-करप्टेड’ असतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आमदार दीपक केसरकर ३ डिसेंबरनंतर सावंतवाडीत असणार का ? ते मुंबईला जातील याचा विचार सावंतवाडीकरांनी करावा,” असे विधान त्यांनी केले. गेली २५ वर्षे या मतदारसंघात जैसे थे अशीच सगळी कामे आहेत. त्यामुळे आता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. विकास करण्यासाठी आता सोपे आहे. विकासाची गंगा आणण्यासाठी सर्वानी एकत्र राहून विकास होऊ शकतो. भाजपच्या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वामुळे सावंतवाडीचा विकास मागे राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मी कोणावरही टीका करणार नाही आणि केली पण नाही. माझा पराभव झाला तरी मी लोकांत काम करीत आहे. लोकांसाठी कार्य करणारा मी लोकांत बसणारा कार्यकर्ता आहे,” असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा