एआयसीटीई व आयएसटीई या संस्थांचा संयुक्त उपक्रम
यशवंतराव भोसले पॉलीटेक्निकमध्ये इनोव्हेशन्स इन काँक्रीट टेक्नॉलॉजी या विषयावर आठवडाभर चालणाऱ्या नॅशनल लेव्हल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन एआयसीटीई, नवी दिल्लीच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट विभागाचे संचालक कर्नल बी.वेंकट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य गजानन भोसले, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.प्रसाद सावंत आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.
एआयसीटीई व आयएसटीई या संस्था देशभरातील अभियांत्रिकी शिक्षकांसाठी वेळोवेळी असे प्रशिक्षण वर्ग आयोजित करतात. यापैकी सिव्हिल विभागासाठीचा हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा मान यावर्षी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला मिळाला.
सुमारे आठवडाभर चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात संपूर्ण देशभरातून एकूण 75 शिक्षक सहभागी झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील 16 नामवंत तज्ञ त्यांना यामध्ये मार्गदर्शन करतील.
काँक्रिटच्या उत्पादनातील नवीन तंत्रज्ञान समजून घेणे. विविध बांधकाम प्रकल्पांचे आयुष्य नवीन तंत्रज्ञानामुळे कसे याची माहिती घेणे. प्रत्यक्ष बांधकाम प्रकल्पात त्याचा उपयोग कसा करावा हे शिकणे. त्याची प्रात्यक्षिके पाहणे असे या परिषदेचे स्वरूप असेल.
उदघाट्न समारंभाचे प्रास्ताविक सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.प्रसाद सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रा.प्रसाद मणेरीकर, प्रा. पार्थ नाईक, प्रा. नंदिता यादव व तेजस नाईक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हवाबी शेख यांनी केले.