You are currently viewing नाते तुटत चालले

नाते तुटत चालले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लेख*

 

*नाते तुटत चालले* 

 

आमच्या आजी आजोबांच्या काळात घरे लहान असायची परंतु एक एका घरात सात सात आठ आठ मुलांचा राबता किंवा पसारा खूप असायचा. नंतर च्या काळात हम दो हमारे चार, नंतर हम दो हमारे दो असा सूर निघाला आता तर

हम दो हमारा एक ह्या नाऱ्यात मग तो मुलगा असो की, मुलगी एकच अपत्य हवे

देशातील लोक संख्येचा वाढता स्फोट किंवा प्रवाह थांबण्यासाठी सुशिक्षितांनी उचलून धरलेली ही विचार धारा आता कळतंय कि किती घातक आहे.

ह्या विचार धारे मुळे नाते संपायला आली. एकच अपत्य झाले की त्या पिढीतील बरीच नाती संपतात. भाऊ, बहिण, पुढे जाऊन आत्या,काका, काकू मामा, मामी, मावशी, मावसा सगळे नाते संपुष्टात येतात मग दूरची नाती तर दूरच जसे चुलत मावस आत्ये भाऊबहिण दूर दूरचा काहिच संबंध नाही.

कुणाला जर दोन किंवा तीन अपत्ये झाली तर आजूबाजूच्यांचा लगेच सूर निघतो की, ‘काय मग पोरं पैदा करायचा कारखाना सुरू केला की काय? ‘ पोरं सांभाळायची ऐपत आहे ना? इथपर्यंत बोलायची मजल जाते त्यांची.

आपलं आई वडीलांनंतर अगदी जिव्हाळ्याच असं कोण तर ते काका काकू आणि आत्या आजी आजोबा कारण आपल्या जन्मापासूनच ते आपल्या लाड कौतुकाचे हक्काचे, दावेदार असतात. आपण त्यांना अगदी जवळून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून वाढलेलो असतो. आई वडीलांनंतर जर कोणी प्रेम माया जिव्हाळा लावणारे असतील ती हक्काची माणसे म्हणजे आजी आजोबा आत्या काका काकू

आजोळचे आजी आजोबा मामा मावशी यांच्या शिवाय जीवन हे अपूर्णच नाही का?

हम दो हमारा एक ह्या संकल्पनेमुळे नाती संपल्यात जमा झाले. पुढची पिढी म्हणेल अरे ते माझे दूरचे काका काकू दूरचे भाऊ बहिण लागतात असे म्हणतील.

अशामुळे हल्ली कुणालाच कुणाचे घेणे देणे राहिले नाही नात्यांची आपुलकी आपलेपणा संपत चालला आहे. नाते तूटत चालले हेच खरे आहे.

 

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा