वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली टाक येथील श्री. हरिश्चंद्र नामदेव वस्त सामान्य घराण्यातल्या माणसानं पोटापाण्यासाठी मुंबई गाठली. वडिलांच्या सोबतीने त्यांनी प्रिंटीग प्रेस मध्ये खिळे जोडून अक्षरे तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचं मन मन रमले नाही. आपण सामाजिक बांधिलकी जपत काही तरी हटके करावे म्हणून त्यांनी १९८५ मध्ये मधुचंद्र विवाह संस्था मुंबईच्या काळाचौकी परिसरातून सुरू करून कित्येक सामान्य कुटुंबातील मुला, मुलींचे विवाह जुळतील याला प्राधान्य दिले. दरम्यान काळानुरूप होणारे बदल लक्षात घेऊन त्यांनी एक पुस्तक काढावं. त्यानुसार अलिकडे आरवली टाक येथील मारुती मंदिर वेंगुर्ला याठिकाणी “आपला जोडीदार आपणच निवडा ” या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे गाबीत समाजाचे नेते श्री. सुरेश बापर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश तथा बाळा वेंगुर्लेकर, नितीन तांडेल, लेखक श्री. हरिश्चंद्र नामदेव वस्त आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सुरेश बापर्डेकर यांनी सांगितले की, हरिश्चंद्र वस्त यांचे कार्य जवळून पाहिले असून खरंतर विवाह जटील समस्या होऊ पाहत आहे. त्यांच्या पुस्तकांच्या नावांत सर्व काही आले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या प्रसंगी लेखक वस्त यांनी या पुस्तकांची संकल्पना मांडली. तर महेश वेंगुर्लेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कोंकणातील विविध प्रश्नांना सोबत लग्न विषय गांभीर्याने कोकण, मुंबईसह या संदर्भात जागृती होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी विवाह इच्छुकांनी व्यक्त केली. सदर प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री. गवंडे , सौ. माधुरी वस्त, राजश्री वस्त यांनी परिश्रम घेतले.
