You are currently viewing मालवणमध्ये भाजपची आज महाभव्य रॅली; वरिष्ठ नेत्यांचा शक्तीप्रदर्शनात सहभाग
Oplus_16908288

मालवणमध्ये भाजपची आज महाभव्य रॅली; वरिष्ठ नेत्यांचा शक्तीप्रदर्शनात सहभाग

शेलार–राणे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता भरड नाका ते फोवकांडा पिंपळ मार्गे शक्तीप्रदर्शन

मालवण :

मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आज सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्व उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

या प्रचार रॅलीला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते आशिष शेलार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भाजपच्या उमेदवारांसाठी ही रॅली निर्णायक ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी १० वाजता भरड नाका येथून रॅलीला सुरुवात होईल. मंत्री आशिष शेलार हे शहरातील बाजारपेठेत प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधणार आहेत. भरड नाका येथे सुरू होणारी ही रॅली बाजारपेठ मार्गे पुढे जाऊन फोवकांडा पिंपळ येथे समाप्त होईल.

या रॅलीच्या माध्यमातून भाजप नागरिकांपर्यंत पोहोचून आपले उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात भाजपची ही रॅली विशेष लक्षवेधी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा