मुंबई :
सद्गुरू राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुलुंड येथील श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज गुरुस्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे भक्तीभावाने आणि आध्यात्मिक उत्साहात मार्गशीर्ष शु. १४ शके १९४६ गुरूवार दि. ४ डिसेंबर २०२५ डी/ ५, औदुंबर सोसायटी, म्हाडा कॉलनी, मुलुंड (पूर्व) मुंबई – ८१ या ठिकाणी श्री दत्तजयत्ती व श्री सत्यनारायण महापूजा सोहळा आयोजित साजरा करण्यात आला आहे. प्रारंभी सकाळी नित्यनैमित्तिक पूजा, श्री. सत्यनारायण महापूजा, श्री. गुरूचरित्र पारायण, महाआरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमासोबत दुपारच्या सत्रात नामस्मरण, सुस्वर भजन, महाआरती, महाप्रसादाने सांगता समारोप होईल तरी सदर उत्सवात सहभागी होऊन आनंदाची लुटी करावी असे श्री समर्थ राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त व कार्यकारी मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
