कणकवलीत परिवर्तनाची चाहूल —
शहर विकास आघाडीच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद
कणकवली
कणकवलीमध्ये झालेल्या शहर विकास आघाडीच्या कॉर्नर सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने शहरात बदलाची नवी लाट सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. नागरिकांनी दाखवलेला उत्साह, नव्या नेतृत्वावरील विश्वास आणि बदलाच्या दिशेने उमटलेले आवाज यामुळे “परिवर्तन अटल” हे घोषवाक्य अधिक दृढ झाले आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. संदेश भास्कर पारकर यांना मिळणारे प्रचंड लोकसमर्थन हे कणकवलीतील नवीन राजकीय वातावरणाचे प्रतीक ठरत आहे. “भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कणकवली ही फक्त घोषणा नाही, तर जनतेची ठाम मागणी आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सभेतील उत्स्फूर्त प्रतिसादाने ही मागणी अधिक स्पष्टपणे अधोरेखित झाली.
या सभेला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री. उदयजी सामंत, आमदार श्री. निलेशजी राणे, माजी आमदार श्री. राजनजी तेली, उपनेते श्री. संजय आंग्रे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. संदेश पारकर, तसेच शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उमेदवार आणि कणकवलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली शहर बदलाच्या निर्णायक टप्प्यावर आहे, आणि या सभेने त्या बदलाची ठोस चाहूल पुन्हा एकदा दिली आहे.
