निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलिसांचे पथसंचलन..
कणकवली
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनामध्ये सुमारे पन्नास पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस ठाणे ते पटवर्धन चौक तेथून बाजारपेठ, पटकीदेवी मंदीर ते रेल्वे स्टेशन तेथून श्रीधर नाईक तिठा आणि तेथून महामार्गावरून पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत हे संचलन करण्यात आले. निवडणूक काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.
